Traffic Tail Startups

दलित स्वयंसेवक संघ चैतन्य यात्रा काढणार =संघ प्रमुख राजाभाऊ धडे

पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह सोलापूरची ब्युरो गणेश रिकिबे policecrimenewslive.com संपर्क 7028623100

कुरूडवाडी दि, सोलापूर दलित स्वयंसेवक संघाची जिल्हा कार्यकारणीची बैठक कुर्डूवाडी विश्रामगृह येथे संपन्न झाली असून यावेळी संघ प्रमुख राजाभाऊ धडे यांनी की दलित स्वयंसेवक संघ ही मातंग समाजाची मातृ असुन ही संघटना शाहु फुले आंबेडकर आण्णाभाऊ लहुजी यांच्या विचारांवर चालणारी असुन या संघटणेने समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन केले आहे तसेच अनेक थोर थोर पुरुषाचे विचार मातंग समाजामध्ये रुजवण्याचे काम केले असुन दलित स्वयंसेवक संघाने मातंग समाजाला अनेक आमदार मंत्री नगरसेवक दिले असुन राजकारणामधे अनेकाना मोठे केले परंतु स्वार्थासाठी संघाचा विसर पडला व त्यांनी संघापासून फारकत घेऊन स्वंताची वेगळी वाट धरली परंतु त्यांच्या बरोबर समाज नाही या करीता सर्व समाज बांधवाना जाहीरपणे आव्हान करतो की दलित स्वयंसेवक संघाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी समाज बांधवानी दलित स्वयंसेवक संघाच्या झेंड्याखाली एकजुट होऊन सर्व क्षेत्रात मागे आसणारा समाज पुढे घेऊन जाऊ खास करुन समाजातील युवक कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सामील व्हावे व समाज सुधारण्यामधे वाटेकरी व्हावे असे आवाहन करण्यात आले तसेच संघाचे महासचिव संजय केंदळे यांनी चैतन्य यात्रेची संकल्पना मांडली यावर कार्यकरणीने सहमती दर्शवली हाच विषय घेऊन संघ प्रमुख राजाभाऊ धडे यांनी उपस्थित पदाधिकारी व सदस्याना केले या बैठकीची प्रस्ताव ना सूत्रसंचलन जिल्हा आध्यक्ष दता आडसूळ यांनी केले या मधे संघाचा पुढील कामकाजाची रुपरेषा मांडली तसेच सर्व पदाधिकाऱ्यांकनी आपले मनोगत व्यक्त केले व आभार प्रदर्शन जिल्हा सचिव आण्णासाहेब पाटोळे यांनी केले या बैठकीस राजाभाऊ धडे संघ प्रमुख संजय केंदळे सचिव नानासाहेब मोरे उपाध्यक्ष मं राज्य दता आडसुळ नाताजी खिलारे आण्णासाहेब पाटोळे अतिश खंदारे बाळासाहेब हजारे संतोष कांबळे परशुराम मोहिते भारत जाधव सुंदर पाटोळे रणधीर लोंढे प्रेम लोंढे दता कांबळे शिवाजी खवळे किशोर देवकुळे रणजित आडसूळ आयुष जाधव सोहेल शेख सोहन जाधव व समाज बांधव उपस्थित होते

Leave a Comment

traffic tail